Mantralaya Hoax Call: मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा  फोन आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये  मंत्रालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा मंत्रालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. निनावी फोन करणाऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे करुन देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे करुन दिले नाही तर मंत्रालयात ठेवलेला बॅाम्बने मंत्रालय उडवून देण्याची धमकी कॉलवर देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीने अहमदनगर येथून फोन केल्याचा प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या फोननंतर मंत्रालयात बॉम्ब शोधक दाखल झाले आहे. मागच्या 15 दिवसात हा दुसरा फोन आहे. त्यामुळे मंत्रालय आणि आजुबाजूच्या परिसराची कसून चौकशी केली जात आहे. सध्या मंत्रालयमध्ये पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.


चाकू घेऊन जाताना एका तरुणाला अटक 


दरम्यान मंत्रालयातून एकाचवेळी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात चाकू घेऊन जाताना एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.  नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षा गेटवर हा प्रकार समोर आला आहे. चाकू प्रशासकीय इमारतीत घेवून जाताना एक इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


मंत्रालयात येणाऱ्यांच्या बॅगेची गेटवर तपासणी केली जाते. यावेळी बॅग स्कॅनरमध्ये बॅग स्कॅन होताना धारधार चाकू सापडल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी वेळीच सावध भूमिका घेत चाकू ताब्यात घेतला आहे. हा तरुण उमरगा येथून आला होता. त्याने चाकू कशा करता आणला होता? याबाबत पोलिस तपास करत आहेत.