मुंबई :  कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने परिक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच प्रमाणे दहावीच्या परिक्षादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा आहे का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कोरोनाच्या नावाखाली दहावीची परिक्षा रद्द करून तुम्ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान करू शकत नाही. विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावायचा? याविषयी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाची काहीतरी तयारी तरी आहे. अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे गुणांकनाचे सूत्र बनवत असल्याचे ते म्हणत आहे. महाराष्ट्राच्या एसएससी बोर्डाची काहीच तयारी नाही. परीक्षा रद्द करून गप्प बसले.' अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे.


परीक्षा घ्यायचीच नाही ही राज्य सरकारची भूमिका योग्य नाही. असे म्हणत पुढील आठवड्यात राज्य सरकारला सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


तसेच परीक्षांबाबत राज्य सरकारने गांभीर्याने विचार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.