Dussehara Melava 2022 : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरे गटाचाच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दसरा मेळावा (Dussehara Melava) घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवाजीपार्कवर दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार आहे.  शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा कोणी घेणार यावरुन राजकारण चांगलंच तापलं होतं. ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) दोघांकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर हा वाद मुंबई हायकोर्टात (Mumbai HighCourt) गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हायकोर्टात आज दोन्ही गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. शिंदे गटाच्यावतीने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करणारी हस्तक्षेप याचिका आमदार सदा सरवणकर यांनी केली होती. पण ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला हा मोठा दणका बसला. तसंच पालिकेने कायद्यानुसार निर्णय घेतलेला नाही असं सांगत कोर्टाने पालिकेलाही फटकारलं आहे.


ठाकरे गटाचा युक्तीवाद
ठाकरे गटाच्यावतीने आस्पी चिनॉय यांनी बाजू मांडली. कोरोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षात दसरा मेळावा होऊ शकलेला नाही. आता शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी या नात्याने अनिल देसाई (Anil Desai) यांनी पालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती. शिवसेनेच्यावतीने पहिला अर्ज करण्यत आला होता. पण कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत पालिकेने परवानगी नाकारली. 2016 मध्ये राज्य सरकारने अध्यादेश काढत शिवसेनेला दसरा मेळावा घेण्याची रितसर परवानगी दिली आहे, असा युक्तीवाद ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आला.


मुंबई पालिकेचा युक्तीवाद
मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वतीने वकिल मिलिंद साठे यांनी युक्तीवाद केला. शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान असून ते शांतता क्षेत्रात मोडतं असं राज्य सरकारचा आदेश आहे. तसंच दसरा मेळावा झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा मुंबई पोलिसांचा अहवाल आहे. त्यामुळे कोणचाही बाजू न घेता कायदेशीर पद्धतीने कोणालाच परवानगी दिली नव्हती असा युक्तीवाद साठे यांनी केला.


पालिकेने घेतला होता हा आक्षेप
दसरा मेळाव्याच्या (shivsena dasra melava 2022) ठिकाणी सुरक्षा दिली जाऊ शकते, मात्र सभास्थळी पोहचण्यापर्यंत रस्त्यात दोन्ही गट एकमेकांसमोर येऊ शकतात. एकाच गटातून दोन्ही गट निर्माण झाले आहेत. प्रत्येक विभागात दोन गट आहेत आणि त्यामुळेच मेळाव्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचताना वाद विवाद होऊ शकतो. याचा प्रत्यय गणपती विसर्जन मिरवणुकीत दादरला (Dadar) आला आहे, असा आक्षेप पालिकेने घेतला होता.