Mumbai Job: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी, इच्छुकांनी `येथे` पाठवा अर्ज
Mumbai High Court Job: मुंबई हायकोर्टात डिस्ट्रीक्ट जज आणि सिनीअर सिव्हील जजची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
Bombay High Court Recruitment: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत विविध पदांची भरती केली जात आहे. याद्वारे तुम्हाला मुंबई हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची संधी आहे. मुंबई हायकोर्टात डिस्ट्रीक्ट जज आणि सिनीअर सिव्हील जजची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांना ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
मुंबई हायकोर्ट भरतीअंतर्गत एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येतील. ज्यामध्ये जिल्हा न्यायाधीशाच्या 4 तर वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशाच्या एका जागेचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर, नाशिक, पालघर, सोलापूर अशा जिल्ह्यांमधील कामकाज पहावे लागेल, याची नोंद घ्या.
कोण करु शकेल अर्ज?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी निकष जाहीर करण्यात आले आहेत. 30 सप्टेंबर 2020 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सेवानिवृत झालेले किंवा सेवानिवृत होणारे उमेदवार जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पदांसाठी अर्ज करू शकतात.
MPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती, सरकारी नोकरी आणि 1 लाखांवर पगार
जिल्हा न्यायाधीशांच्या संवर्गातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांचा जिल्हा न्यायाधीश पदासाठी अर्ज करता येईल. तसेच जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या संवर्गातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांचा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश या पदासाठी अर्ज पाठवू शकतात. असे असले तरी स्वेच्छेने सेवानिवृती घेतलेल्या किंवा पदावरून काढललेल्या उमेदवारांना या जागांसाठी नोकरीची संधी मिळणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
सार्वजनिक बांधकाम विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; 'येथे' पाठवा अर्ज
ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज rgrp-bhc@bhc.gov.in येथे पाठवायचे आहेत. तर ऑफलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज रजिस्ट्रार जनरल, हायकोर्ट ऑफ बॉम्बे, फोर्ट, मुंबई, 400032 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून 23 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
मुंबई पालिकेअंतर्गत भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी
सायन येथील लोकमान टिळक रुग्णालयात ‘स्वच्छता निरिक्षक’(Sanitation Inspector) पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.सॅनिटायझेशन इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबत अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा किंवा हेल्थ इन्स्पेक्टरचा डिप्लोमा पूर्ण करणे गरजेचे आहे. सॅनिटायझेशन इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे. स्वच्छता निरिक्षक पदासाठी उमेदवारांनी आपले अर्ज लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आवक / जावक विभाग, शीव येथे पाठवायचे आहेत. 25 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. स्वच्छता निरिक्षक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.