Breaking | अनिल देशमुख यांच्यावर ED कडूनही गुन्हा दाखल
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मनीलॉंडरींग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate)कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मनीलॉंडरींग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate)कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी CBIने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ईडीनेही देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने सीबीआयकडे देशमुख यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.
सीबीआयने देशमुखांशी संबधित राज्यातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता. हे प्रकरणी आर्थिक गुन्ह्यांशी निगडित असल्यामुळे आता अंमलबजावणी संचालनालयनेही देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.