मुंबई : आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या जाणून घ्या... पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट मध्यरात्री 2 वाजता हॅक... म्हाडा भरतीची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली... म्हाडा परीक्षेप्रकरणी पुण्यातून तिघांना अटक... मुंबईत दुस-यांदा कोरोना रुग्णांची 'शून्य मृत्यू' नोंद...

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट मध्यरात्री 2 वाजता हॅक करण्यात आलं होतं...हॅकरनं ट्विटर हॅक करून  बिटकॉईनला कायदेशीर मान्यता दिल्याचं ट्विट केलं...त्यानंतर दोन मिनिटांतच ट्विटर डिलीट करू  पुन्हा एकदा बिटकॉईनबाबत ट्विट केलं...मात्र, ट्विटर हॅक झाल्याचं कळताच तातडीने खबरदारी घेत काही वेळात ट्विटर अकाऊंट सुरक्षित करण्यात आल्याची माहिती पीएमओनं दिलीय...

2. म्हाडा भरतीची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे.  तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पुढे ढकलली असल्याचं सांगण्यात येत आहे. जानेवारीत म्हाडाची परीक्षा होणार आहे. अचानक परीक्षा पुढे ढकलल्यानं उमेदवारांत नाराजी दिसून येत आहे.  परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

3.म्हाडा परीक्षेप्रकरणी पुण्यातून तिघांना अटक केली. पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. पुणे सायबर पोलिसांची कार्यवाही सुरू असून मोठे मासे गळाला लागल्याची माहिती आहे...

4 राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे.. राज्यात शनिवारी 807 नवीन रुग्ण समोर आले..तर 869 रुग्ण बरे झाले..सध्या राज्यात 6452 रुग्णांवर उपचार सुरु आहेत..आतापर्यंत राज्यात 1लाख 41हजार 243 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

5. मुंबईत शनिवारी कोरोनाचा एकही बळी नाही. कोरोना नियंत्रणात ठेवण्यात पालिकेला यश मिळालं आहे. राबवलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात आल्याचं सांगण्यात येत आहे.

6. ओमायक्रॉन व्हेरीयंट डेल्टापेक्षा सौम्य असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण घरात 10 किंवा 14 दिवसांच्या विलगीकरण कालावधीत बरे होत आहेत. दरम्यान, नागरिकांनी दक्षता पाळण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे. तर भारताला ओमायक्रॉनचा आर्थिक फटका कमी प्रमाणात बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.