गोरेगाव येथे पूलाचा गर्डर अचानक कोसळला, वाहतूक कोंडी
गोरेगाव इथं पूलाच्या बांधकामा दरम्यान गर्डर अचानक कोसळलाय.
मुंबई : गोरेगाव इथं पूलाच्या बांधकामा दरम्यान गर्डर अचानक कोसळलाय. गोरेगाव हायवे ते लिंक रोड यांना जोडणा-या रस्त्यावर पूलाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. हे काम सुरु असतानाच हा गर्डर कोसळलाय. त्यामुळे एस.व्ही. रोडवरील वाहतूक वळवण्यात आलीय. हा गर्डर काढण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.