मुंबई : येथील राजभवन येथे दोन ब्रिटिशकाली तोफा सापडल्यात. यामुळे राजभवनाचे ऐतिहासिक महत्त्व वाढले आहे. या तोफांचे जनत करण्यात येणार आहे. त्यामुळे इतिहासप्रेमींना अभ्यासाठी हा एक अनमोल तोफा असणार आहे. या तोफांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन राज्यप चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनी नौदलाच्या तज्ज्ञांची मदत घेऊन तोफांची तांत्रिक माहिती घेण्याचे तसेच तोफांचे जुने अभिलेख असल्यास तपासण्यास सांगितले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन येथे या तोफा सापडल्यात. या तोफांचे वजन प्रत्येकी 22 टन आहे. या दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या. या तोफा अनेक दशके मातीखाली दबून होत्या. या तोफा राजभवनातील जल विहार हॉलच्यासमोर दर्शनी भागात ठेवण्याची देखील राज्यपालांनी सूचना केली आहे. 



या तोफांचे वजन प्रत्येकी 22 टन असून लांबी 4.7 मीटर, तर अधिकतम व्यास 1.15 मीटर इतका आहे. दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने 50 मीटर उंच उचलण्यात आल्या व त्यानंतर राजभवनाच्या हिरवळीवर ठेवण्यात आल्या. 2016 मध्ये राज्यपालांच्या निवासस्थानाखाली सापडलेल्या भूमिगत बंकरच्या परिरक्षणाचे काम एका तज्ज्ञ वास्तुविशारद फर्मच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. हे काम झाल्यानंतर त्याठिकाणी संग्रहालय निर्माण करून बंकर जनतेसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यात आता भर पडणार आहे.