घराचा ताबा वेळेत न दिल्याने बिल्डरला ६ वर्षांचा कारावास !
साई निनाद एन्टरप्रायजेसने ग्राहकाला वेळीच ताबा न दिल्याने सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे.
मुंबई : साई निनाद एन्टरप्रायजेसने ग्राहकाला वेळीच ताबा न दिल्याने सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे.
महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 'मिड डे' या इंग्रजी वर्तमानपत्राने या बाबतचे वृत्त दिले आहे.
मीरा रोड परिसरात चंद्रप्रकाश सिंह यांनी दोन फ्लॅटची बुकिंग केली होती. घराची रक्कम २०१० साली बिल्डरला देण्यात आली होती. तसेच घराचा ताबा २०१३ साली मिळणं अपेक्षित होतं मात्र अजूनही बिल्डरने हा प्रकल्प पूर्ण केलेला नाही.
बिल्डरकडून घराच्या ताब्याबाबत मिळणारी टोलवाटोलवीची उत्तरं पाहता चंद्रप्रकाश यांनी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. या तक्रारीची दखल घेत साई निनाद एन्टरप्राईजेसच्या अमित पालशेतकर यांना अटक करून न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
चंद्रप्रकाश सिंह यांनी 42.52 लाखांचा टू बीएचके आणि 7.50 लाखांचा वन बीचके बुक केला होता. त्याचे पैसेही भरले होते. मात्र 2013 साली मिळणारा ताबा अजूनही त्यांना मिळाला नाही. म्हणूनच त्यांनी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली.