झवेरी बाजारात सीपी चाळ इमारतीचा मोठा भाग कोसळला
मुंबईच्या झवेरी बाजारमध्ये सीपी चाळ ५०/५२ इमारतीचा मोठा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबई : मुंबईच्या झवेरी बाजारमध्ये सीपी चाळ ५०/५२ इमारतीचा मोठा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या इमारतीच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना इमारतीच्या मागील बाजूचा भाग कोसळला. या दुर्घटनेत २ जण ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर ६-७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोलीस, फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले आहेत.