मुंबई : मुंबईतील खार येथे एक इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. खार पश्चिम येथील जिमखान्याजवळ ही इमारत कोसळल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या इमारतीखाली काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खारमधील हा भाग अतिशय दाटीवाटीचा तसेच वर्दीळीचा आहे. या भागत काही झोपडपट्टीदेखील आहेत. त्यामुळे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


ही इमारत धोकादायक असल्याची माहिती मिळत आहे.