बैलगाडा शर्यतींवर हायकोर्टाकडून बंदी कायम
बैलगाडी शर्यतींवर लागू असलेली बंदी मुंबई हायकोर्टाकडून तीन आठवड्यांकरता कायम ठेवण्यात आलीय.
मुंबई : बैलगाडी शर्यतींवर लागू असलेली बंदी मुंबई हायकोर्टाकडून तीन आठवड्यांकरता कायम ठेवण्यात आलीय.
राज्य सरकारनं हायकोर्टात दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भातील सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून दोन आठवड्यांत सुधारीत नियमावली सादर करणार असल्याचं सांगण्यात आलं.
राज्यात बैलगाडी स्पर्धेसाठी परवानगी देण्यास मुंबई हायकोर्टानं मनाई केलीय. त्यामुळे यंदा राज्यात कोठेही या स्पर्धांच्या आयोजनाची परवानगी देण्यात आलेली नाही.
राज्य सरकारनं या संदर्भात अधिसूचना जरी काढली असली तरी जोपर्यंत बैलगाडी स्पर्धां दरम्यान बैलांना इजा न होणार नाही, याविषयी सरकार नियमावली बनवत नाहीत आणि आमच्यासमोर सादर करून आम्ही परवानगी देत नाही तोपर्यंत बैलगाडी स्पर्धांना परवानगी नाही, असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय.