मुंबई : राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी आहे. पण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीरा भाईंदरच्या मुख्य रस्त्यावरच दोन बैलगाड्यांची शर्यत रंगली आहे.  हा शर्यतीचा थरार कुणीतरी मोबाईल व्हिडिओमध्ये टिपलाय. दोन बैलगाड्या एकमेकांशी शर्यत लावत, भरधाव वेगानं धावतायत, असं त्यात स्पष्ट दिसतंय. एवढंच नव्हे तर सुसाट वेगाने पळणा-या या बैलगाड्यांपैकी एक बैलगाडी रस्त्यावरच पलटी झाली.


त्यात बसलेले चार तरूण रस्त्यावरच खाली पडले. गेल्या 25 डिसेंबरला शूट करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झालाय. काशीमीरा इथल्या सेंट जेरोम चर्चमध्ये ख्रिसमसच्या निमित्तानं भाईंदरच्या उत्तन, गोराई, मनोरी भागातून नागरिक येतात. घोडागाडी आणि बैलगाडी घेऊन येणारे हे लोक सायंकाळी उत्सव साजरा करून, घरी जाताना एकमेकांशी शर्यत लावतात.


त्यापैकीच हे लोक आहेत. या अपघातात बैलगाडीतले तरूण किरकोळ जखमी झाले. पण हे तरूण नेमके कोण, हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.