तुमच्या खिशावरचा बोजा वाढणार, १ जानेवारीपासून या वस्तूंच्या किमतीत होणार वाढ
पुढील महिन्यापासून म्हणजेच १ जानेवारी २०२२ पासून सर्वसामान्यांना अनेक गोष्टींवरील वाढत्या कराचा सामना करावा लागणार आहे.
मुंबई : नविन वर्ष म्हणजेच २०२२ वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. पण नविन वर्षात सर्मसामान्यांच्या खिशावरचा बोजा वाढणार आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच १ जानेवारी २०२२ पासून सर्वसामान्यांना अनेक गोष्टींवरील वाढत्या कराचा सामना करावा लागणार आहे. नविन वर्ष आपल्या प्रत्येकासाठी नक्कीच भरपूर आनंद घेऊन येणारे असेल. पण त्याचबरोबर आपल्या खिशावरही थोडा ताण पडणार आहे. नव्या वर्षात कपडे, शूज आणि चप्पल खरेदी करण्यापासून ते ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्वच गोष्टी महाग होणार आहेत.
GST त होणार वाढ
1 जानेवारीपासून रेडिमेड कपड्यांवरील जीएसटी दर 5% वरून 12% होईल. त्यामुळे रेडिमेड कपड्यांच्या किमती वाढतील. जीएसटी वाढल्याने किरकोळ व्यवसायावर त्याचा वाईट परिणाम होणार असल्याचं कापड व्यावसायिकांचं म्हणणं आहे. रेडीमेडच्या व्यापाराशी संबंधित व्यापारी जीएसटी वाढवण्यास विरोध करत आहेत. मात्र सरकार निर्णय मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही. अशा परिस्थितीत नवीन वर्षात तयार कपडे घेण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या कर स्लॅबमधील नवीन बदल 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल.
GST वाढल्याने सर्वसामान्य नाराज
GST दर वाढल्याने सामान्य लोकही नाराज आहेत. जीएसटी वाढल्यामुळे कपड्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढतील, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आधीच व्यापारी त्रस्त आहेत. बाजारात मंदीचं वातावरण आहे. त्यातच जीएसटीत वाढ झाल्यास त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे.
असा होणार टॅक्स स्लॅबमध्ये बदल
1,000 पर्यंतचे शूज आणि चप्पलवर 5% GST लागतो. पण त्यासाठी लागणारे कच्च्या मालावर 18% कर लागू आहे, याशिवाय चामड्यावर १२ टक्के कर आकारला जातो. शूज आणि चप्पलवर सरकारला वर्षाला सुमारे 2,000 कोटी रुपयांचा परतावा द्यावा लागतो. खरंतर, पादत्राणे, कपडे आणि खतांवरील शुल्क रचनेत गेल्या वर्षी जूनमध्येच बदल केला जाणार होता. पण कोरोना महामारीमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता.
ऑनलाइन अन्न महागणार
कपडे आणि शूज व्यतिरिक्त, जर तुम्हाला ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर करायचे असतील, तर तुमच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. कारण १ जानेवारीपासून ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटो (Zomato App) आणि स्विगीवरून (Swiggy App) खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यावरही कर भरावा लागणार आहे.
कंपनी ग्राहकांकडून वसूल करणार पैसे
नवीन वर्षात फूड डिलिव्हरी अॅप्सवर 5% जीएसटी लागू होईल. मात्र, सरकार हा कर ग्राहकांकडून वसूल करणार नसून अॅप कंपन्यांकडून वसूल करणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. पण सरकारकडून बोजा पडल्यास अॅप कंपन्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे ग्राहकांकडून वसूल करतात, हे ठरलेलं असतं. अशा स्थितीत ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवणाऱ्यांना महागाईचा सामना करावा लागणार आहे.
तुमचा आवडता पिझ्झा महागण्याची चिन्ह
डॉमिनोज पिझ्झा बनवणारी ज्युबिलिअंट फुड्स कंपनी पिझ्झाच्या किमती वाढवण्याचा विचार करतंय. मॉर्गन स्टॅनले या परदेशी संस्थात्मक गुंतवणूक कंपनीच्या अहवालात असा उल्लेख करण्यात आला आहे.
२०१६ पासून पिझ्झाच्या किंमती वाढवल्या नसल्यानं डॉमिनोज पिझ्झाच्या किंमती वाढवण्याचा विचार सुरु झाला आहे. पिझ्झाच्या किंमती वाढवण्याच्या बातम्यांमुळे ज्युबिलिअंट फूड्सचा शेअर आज पाच टक्के वधारला