Shivsena Dasara Melawa: शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचा दसरा मेळावा (Dasara Melawa) 'आझाद मैदान'वर (Azad maidan) होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर नवरात्रोत्सवाआधीच दोन्ही गटांमध्ये होणाऱ्या वादावर पडदा पडला होता. दादर शिवाजी पार्कच्या (Shivaji Park) जागेसाठी ठाकरे गट आणि शिंदे गट आक्रमक होते. मात्र त्यानंतर शिंदे गटाने आझाद मैदानावर दसरा मेळावा घेण्याचं ठरवलं आहे. मात्र आता हा मेळावा वादात सापडण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्षे दसऱ्याच्या दिवशी या मैदानावर रावन दहनाचा (ravan dahan) कार्यक्रम होत होता. मात्र आता शिंदे गटाच्या मेळाव्यामुळे रावण दहनाचा कार्यक्रम आदल्याच दिवशी उरकण्यास आयोजकांना सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता शिंदे गटाच्या मेळाव्यावरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आझाद मैदानात होत असलेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा तिथे होणाऱ्या रामलीला कार्यक्रमावरही परिणाम होणार आहे. आझाद मैदानावर दोन संस्थांतर्फे रामलीलाचा कार्यक्रम होत असतो. तसेच प्रथेप्रमाणे तिथे विजयादशमील रावणवधाचा कार्यक्रमही होतो. मात्र शिंदे गटाच्या मेळाव्यापूर्वी हे मैदान रिकामे व्हावे, यासाठी नवव्या दिवशीच रावणवध आटोपून घ्या असा दबाव आणण्यात आल्याचा आरोप काही आयोजकांनी केला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी रावणाचे दहन आदल्या दिवशीच करण्यास सांगितल्याने याची जोरदार चर्चा सुरुय.


आझाद मैदानावर दरवर्षीप्रमाणे यावेळीही साहित्य कला मंच आणि महाराष्ट्र रामलीला मंडळ या दोन संस्थांतर्फे रामलीला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेपासून मैदानावर या कार्यक्रमामध्ये रामायणातील प्रसंग सादर करण्यात येतात. शेवटी विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला जातो. मात्र यावर्षी आझाद मैदानावर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यामुळे नवव्या दिवशीच रावणदहनाचा कार्यक्रम करण्यास सांगण्यात आल्याचे काही आयोजकांनी म्हटलं आहे.


शिंदे गटाच्या मेळाव्याची झळ रावण दहनाला बसण्याची चर्चा सुरु झाल्यापासून यावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही यावरुन टीका केली आहे. "रावणाचा वध हा दसऱ्याच्या दिवशी न करता आदल्या दिवशी करा अशी परंपरा महाराष्ट्राच्या नवीन संतांनी आणली आहे. कारण त्याठिकाणी त्यांना सभा घ्यायची आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे  लोकांच्या भावनांची कदर न करता आणि भारतीय संस्कृतीचे जतन न करता त्यांना स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी परंपरागत चालत आलेली रामलीला एक दिवस आधीच बंद करण्याचा निर्णय इथल्या राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो," असे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.