Philanthropic Industrialists : देशात चालू आर्थिक वर्षात सर्वात जास्त दान (Charity) करणाऱ्या अरबपतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 119 श्रीमंत उद्योगपतींनी तब्बल 8,445 कोटी रुपयांचं दान केलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 59 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हा आकडा 200 टक्के जास्त आहे. एडेलगिव हुरुन इंडिया फिलॅथ्रोपी लिस्ट 2023 ने जाहीर केलेल्या यादीत टॉप 10 दानशूर उद्योगपतींनी तब्बल 5806 कोटी रुपयांचं दान केलं आहे. गेल्या वर्षात म्हणजे 2022 मध्ये ही रक्कम 3,034 इतकी होती. सर्वात दानशूर उद्योगपतींमध्ये (philanthropic industrialists) शिव नाडर हे अव्वल स्थानावर आहेत. तर निखिल कामथ हे सर्वात तरुण दानशूर ठरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयटी कंपनी HCL चे को फाऊंडर 78 वर्षांचे शीव नाडर यांनी दानशूर उद्योगपतींच्या यादीतलं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. देशातल्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत शीव नाडर चौथ्या क्रमांकावर आहे. पण दान देण्यात ते पहिल्या स्थानी आहेत. उद्योगपती शीव नाडर यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये तब्बल 2,042 कोटी रुपये दान केले आहेत. म्हणजे एका दिवसाला त्यांनी 5.6 कोटी रुपयांचं दान दिलं आहे. शीव नाडर यांच्या नंतर  विप्रोचे संस्थापक-अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचा नंबर लागतो. अझीम प्रेमजी यांनी  1,774 कोटी रुपयांचं दान केलं आहे. 


भारत आणि एशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी हे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रिलायंस इंजस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 376 कोटी रुपये दान स्वरुपात वाटले आहेत. याशिवाय टॉपटेनमध्ये कुमार मंगलम बिरला, गौतम अदानी, अनिल अग्रवाल, नंदन निलकेणी, सायरस आणि अदार पूनावला, तसंच रोहिणी निलकेणी यांचा समावेश आहे. या यादीत एकूण 119 दानशूर व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. या व्यक्तींनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये एकूण  8,445 कोटी रुपयांचं दान केलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 59% इतका जास्त आहे. 


सर्वात तरुण दानशूर
देशातल्या टॉप दानशूरांच्या यादीत या वर्षी ऑनलाईन ब्रोकिंग फर्म Zerodha चे दोन संस्थापक नितीन आणि निखिल कामथ यांचा समावेश झाला आहे. कामथ बंधुंनी 2023 या वर्षात तब्बल 110 कोटी रुपयांच दान स्वरुपात वाटप केलं आहे. निखिल कामथ यांनी आपली अर्धी संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला, यासाठीच्या द गिविंद प्लेजवर ही त्यांनी स्वाक्षरी केली आहे. याशिवाय इन्फोसिसच्या सहसंस्थापकांसह पंचवीस नव्या दानशूर व्यक्तींचा समावेश झाला आहे. यात इन्फोसिसचे सहसंस्थापक के दिनेश,भिलो इंडस्ट्रीजचे रमेशचंद्र टी जैन अँड फॅमेली, एक्सलचे प्रशांत प्रकाश आणि जोहो कॉर्पोरेशनचे वेम्ब राधा यांचा समावेश आहे.