देशात या मेट्रो शहरात 33 रुपये स्वस्त मिळतंय पेट्रोल; मुंबईत होतेय सर्वात महाग पेट्रोलची विक्री
तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या नवीन किंमती जारी केल्या आहेत. सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.
मुंबई : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या नवीन किंमती जारी केल्या आहेत. सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. केंद्र सरकारकडून दिवाळीच्या आधी पेट्रोल-डिझेलवर लागणारी एक्साइज ड्युटी कमी करण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांनी VAT कमी केला होता. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल होता.
IOCL नुसार महानगरांमध्ये लेटेस्ट रेट
मेट्रो शहर पेट्रोल रुपये / लीटर डीझेल(रुपये/लीटर)
दिल्ली 103.97 86.67
मुंबई 109.98 94.14
कोलकाता 104.67 89.79
चेन्नई 101.40 91.43
महानगरांमध्ये सर्वात स्वस्त डिझेल
देशातील चार महानगरांमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल चेन्नईमध्ये तर सर्वात स्वस्त डिझेल दिल्लीमध्ये मिळत आहे. तसेच मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमती सर्वाधिक आहेत.
सर्वात महाग पेट्रोल-डिझेलचे शहर
राजस्थानमध्ये देशातील सर्वात महाग पेट्रोल - डिझेल मिळत आहे. राजस्थानच्या श्रीगंगानंगरमध्ये एक लीटर पेट्रोल 116 रुपयांना मिळत आहे. तर डिझेल 100.21 रुपये प्रति लीटर विकले जाते आहे. तसेच राजस्थानातील दुसऱ्या एक शहर म्हणजेच हनुमानगढमध्ये पेट्रोल 115.21 रुपये प्रति लीटर आणि डीझेल 99.49 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.
कुठे मिळतेय सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल
श्रीगंगानंगरच्या तुलनेत 33.38 रुपये पेट्रोल आणि 23.40 रुपये स्वस्त डिझेल पोर्ट ब्लेअर (अंदमान बेट) वर मिळत आहे.
पोर्ट ब्लेअरवर डिझेल 80.96 पेसे तर पेट्रोलची किंमत 87.10 रुपये प्रति लीटर आहे.
या राज्यांनी कमी केला VAT
केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्युटी कमी केल्यानंतर अनेक राज्यांनी वॅट कमी केला. या राज्यांमध्ये कर्नाटक, पद्दुचेरी, मिझोरम, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव, चंदिगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि लदाखचा सामावेश आहे.
दरम्यान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली सारख्या गैर भाजप शासित राज्यांनी VAT मध्ये कपात केलेली नाही.