मुंबई : शेतक-यांना देण्यात येणा-या तातडीच्या १० हजार रूपयांच्या कर्जाचा जीआर तात्काळ रद्द करण्याची मागणी सुकाणू समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे. थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समितीच्या नावातून थकीत शब्द काढून सरसकट शब्द वापरावा असं या बैठकीत सांगण्यात आलं. 


सरकारसोबत होणा-या बैठकीपूर्वी सुकाणू समितीच्या सदस्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. पीक कर्जासह इतर शेतीपूरक कर्जमाफीसाठी सुकाणू समिती आग्रह करणार आहे. थकीत कर्ममाफी निकष निर्धारण समितीची बैठक थोड्याच वेळात होणार आहे. या समितीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उच्चाधिकार समिती आणि शेतकरी संघटना, सुकाणू समितीचे सभासद उपस्थित राहतील.