मुंबई : MPSC Exam : राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) धोका पुन्हा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमध्ये जरी शिथिलता दिली तरी कोविड-19 नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनामुळे मुंबईत लोकल प्रवासाला सर्वसामान्यांना बंदी कायम आहे. मात्र, एमएमआरमधल्या उमेदवारांना दिलासा देण्यात आला आहे. एमपीएसी (MPSC Exam) उमेदवारांना 4 सप्टेंबरला परीक्षेसाठी रेल्वेतून प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने (Maharashtra State Government ) कोरोना लसीचे (Vaccine) दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेतून (Train) प्रवास करण्याची परवानगी (Permission) दिली असली, तरी सर्वसामान्यांना रेल्वे प्रवास करता येत नाही. सरकारने कोरोना (Corona) प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी दिलेली आहे. याचबरोबर मॉल्स, खासगी कार्यालय, हॉटेल इत्यादीही सुरू करण्यात आली आहेत.  


मुंबई महानगर क्षेत्रातील उमेदवारांना 4 सप्टेंबर, 2021 रोजी आयोजित MPSC परीक्षेसाठी लोकल प्रवासास अनुमती देण्यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार परीक्षेसाठी एमपीएसीच्या उमेदवारांना रेल्वेतून प्रवास करता येणार आहे.


MPSCची संयुक्त पूर्वपरीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता 4 सप्टेंबरला MPSCची परीक्षा घेण्यात येत असून विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची (Local travel) परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. कोरोना काळात केवळ अत्यवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तसेच दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी होती.