टेरेसवरच उभारला विमान निर्मितीचा प्रकल्प
मागील दीड वर्ष सरकारी लालफितीच्या कारभारात अडकलेला देशातील पहिला विमान निर्मिती प्रकल्प आता मार्गी लागण्याची चिन्हं आहेत.
मुंबई : मागील दीड वर्ष सरकारी लालफितीच्या कारभारात अडकलेला देशातील पहिला विमान निर्मिती प्रकल्प आता मार्गी लागण्याची चिन्हं आहेत. कॅप्टन अमोल यादव यांनी मुंबईतल्या आपल्या राहत्या घराच्या गच्चीवरच, १९ आसनी विमान निर्मितीचं काम सुरु केलं आहे.
या विमान निर्मितीच्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्याधिकारी कौस्तुभ धवसे यांनी केली. राज्य सरकारकडून कॅप्टन अमोल यांना विमान निर्मितीसाठी जमीन देण्याबरोबरच, दिल्लीतल्या डीजीसीएच्या परवानग्या आणि इतर मदत करण्याचंही आश्वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र याबाबत अजूनपर्यंत विशेष प्रगती झालेली नाही.
धवसे यांनी १९ आसनी विमान निर्मितीची पाहणी केल्यानंतर, सरकार लवकरच सगळ्या प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करेल. तसंच लवकरच हे विमान आकाशात झेपावलेलं पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला.