मुंबई : कुर्ला नेहरुनगर इथं एका महागड्या कारने पादचाऱ्याला धडक दिली. या धडकेत हा पादचारी जखमी झालाय. मात्र २३ तारखेला दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला होता. मात्र या गाडीने धडक दिली त्या ताफ्यातील एका गाडीतून भैय्यूजी महाराज प्रवास करत असल्याचा आरोप जखमी व्यक्तीच्या नातेवाईकाने केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भैय्यूजी महाराज कुर्ला इथं एका जीर्णोद्धाच्या कार्यक्रमाला आले होते. या कार्यक्रमातून परतत असताना नेहरुनगरच्या इमारत क्रमांक ४८ जवळ हा अपघात झाला. जखमीचे नाव मनोज गडकरी असून ते ५३ वर्षांचे आहेत. त्यांच्यावर सोमय्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेहरुनगर पोलिसांनी अज्ञात गाडी चालकावर गुन्हा दाखल केलाय.