मुंबई : अभिनेता रणवीर सिंहच्या (Actor Ranveer Singh Nude Photoshoot) अडचणीत वाढ झाली आहे. न्यूड फोटोशूट प्रकरणी रणबीरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रणवीरला हे प्रकरण चांगलंच महागात पडल्याचं म्हटलं जात आहे. समाजसेवी संस्थेच्या तक्रारीनंतर रणवीर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. (case file against bollywood actor ranveer singh nude photoshot under the it act at chembur police station)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीरचं न्यूड फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे. या फोटोशूटमुळे रणवीर जितका चर्चेत राहिला तितकाच त्याला विरोधही सहन करावा लागला. अनेकांनी या फोटोशूट विरुद्ध आक्षेपही घेतला. मात्र एका समाजसेवी संस्थेने थेट या फोटोशूटविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीनंतर अखेर चेंबूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.  रणवीर विरुद्ध 67 A, 292, 293, 354 आणि 509 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


रणवीरवर आयटी ऍक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रणवीरला या प्रकरणी काय शिक्षा होऊ शकते हे आपण जाणून घेऊयात.


रणवीरला काय शिक्षा होऊ शकते? 


रणवीरला आयपीसी 292 नुसार 2 वर्षांपर्यंत कारावास भोगावा लागू शकतो. तसेच कलम 293 नुसार 3 वर्ष तुरुंगवास आणि 3 हजार दंडही द्यावा लागू शकतो. आयटी एक्ट 67 A नुसार 5 वर्ष कारावास आणि 10 लाख रुपयांचा दंडही होऊ शकतो.