Venugopal Dhoot : चंदा कोचर यांच्यावरील कारवाईनंतर आता सीबीआयनं आणखी एक मोठी कारवाई करत व्हिडिओकॉन ग्रुपचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांना मुंबईतून अटक केली. आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर आणि माजी सीईओ दीपक कोचर यांच्या अटकेनंतर धुत यांनाही अटक करण्यात आल्यामुळं सर्वांच्या नजरा या प्रकरणाकडे वळल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेकायदेशीर कर्ज प्रकरणी करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये सध्याच्या घडीला ही सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. ज्यावेळी चंदा कोचर ICICI बँकेत महत्त्वाच्या पदावर कार्यरत होत्या, तेव्हा त्यांनी व्हिडीओकॉन समुहाला कर्ज दिलं होतं. त्याबदल्यात त्यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीसाठी Videocon कडून गुंतवणूक पुरवण्यात आली होती असा आरोप आहे. दरम्यान, व्हिडीओकॉन समुहाला तब्बल 3250 कोटी कर्ज दिल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वीच आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर आणि माजी सीईओ दीपक कोचर यांना अटक केली. ज्यानंतर मुंबईतील विशेष न्यायालयानं त्यांना सीबीआय कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला. 


नेमकं प्रकरण आणि आर्थिक उलाढालीचा आकडा पाहून चक्रावून जाल 


सध्या हाती असणाऱ्या माहितीनुसार 2012 मघ्ये व्हिडीओकॉन समुहाला ICICI बँकेनं कर्ज दिलं होतं. पुढे हीच रक्कम एनपीए झाल्याचं म्हणत एक मोठा घोटाळा उघडकीस आला. सदर प्रकरणी 2020 मध्ये ईडीनं दीपक कोचर यांना ताब्यात घेतलं होतं. ज्यावेळी ICICI  बँकेकडून Videocon ला कर्ज देण्याक आलं त्याच्या सहा महिन्यांनंतर धूत यांची मालकी असणाऱ्या कंपनीकडून दीपक कोचर यांची 50 टक्के भागिदारी असणाऱ्या कंपनीसाठी 64 रुपयांची गुंतवणूकवजा कर्जाऊ रक्कम देण्यात आली. 


हेसुद्धा वाचा : Chanda Kochhar: सीबीआयची मोठी कारवाई! ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांना अटक


वेणुगोपाल यांना फायदा ? 


सदर प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपांनुसार वेणुगोपाल यांना चंदा कोचर यांच्या निर्णयांमुळं आर्थिक फायदा झाला. 2018 मध्ये ज्यावेळी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं तेव्हा कोचर यांना बँकेतील नोकरीचा त्याग करावा लागला होता. 2019 मध्ये या प्रकरणी न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्णा यांच्या समितीकडून एक अहवाल सादर करण्यात आला. धुत यांना कर्ज देण्यासाठी कोचर यांनी नियमभंग केल्याची बाब इथं नमूद करण्यात आली होती.