मुंबई : PNB घोटाळा प्रकरणात दिवसेंदिवस नवनवी माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी बँक अधिकारी आणि नीरव मोदी यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली. सीबीआयने सर्वात जास्त 5 तास नीरव मोदीचे जवळचे विपुल अंबानी यांची चौकशी केली.


कोण आहेत विपुल अंबानी ?


 विपुल अंबानी हे धीरूभाई अंबानी यांचे भाचे आहेत. विपुल अंबानी हे फायरस्टार इंटरनॅशनलचे CFO आहेत. आणि ही नीरव मोदी यांची कंपनी आहे. विपुल अंबानी ही अशी व्यक्ती आहे ज्याला कंपनीतील सर्व आर्थिक बाजू माहित असतात. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ही चौकशी करण्यात आली. विपुल रिलायन्स इंडस्ट्रीचे मुख्य मुकेश अंबानीचे चुलत भाऊ आहेत. सीबीआयने गीतांजली समूहातील 18 कंपन्यांचे बॅलेन्स शीट सांभाळतात. सीबीआयने यासोबतच 10 निलंबित कर्मचाऱ्यांशी 8 तास केली चौकशी 



घोटाळ्याची रक्कम वाढू शकते 


सीबीआयला पीएनबी घोटाळ्याची किंमत ही 11,394 करोड रुपयांपेक्षा जास्त असण्याची शंका आहे. रविवारी सर्व बँकांकडे एलओयूमध्ये झालेल्या गोंधळाचा रिपोर्ट मागितला आहे.