सीबीआयने सुशांतचा कूक नीरजला विचारले हे ८ प्रश्न
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयची टीम मुंबईमध्ये दाखल झाली आहे.
मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयची टीम मुंबईमध्ये दाखल झाली आहे. सीबीआयच्या टीमने सुशांतचा कूक नीरज याची चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये सीबीआयने नीरजला ८ प्रश्न विचारले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सीबीआय नीरजची १३ जूनला घटलेल्या घटनांची चौकशी करत आहे.
सीबीआयने नीरजला विचारले हे प्रश्न
१ सुशांतच्या मृत्यूवेळी खोलीमध्ये कोण कोण उपस्थित होते?
२ सुशांतने बाकी लोकांसोबत किती वेळ घालवला?
३ सुशांत कसा वागत होता?, खासकरून १३ जूनला
४ सुशांतने त्यादिवशी नेहमीप्रमाणे खाललं का?
५ सुशांत किती वाजता जेवायला गेला?
६ सुशांतचा मृतदेह सगळ्यात आधी कोणी बघितला?
७ सुशांतचा मृतदेह उतरवण्यासाठी कोणी सांगितलं का? जर हो तर ते कोणी सांगितलं?
८ पीसीआरला केव्हा फोन करण्यात आला? आणि फोन कोणी केला?
सुशांतचा मृतदेह सगळ्यात आधी पाहणाऱ्यांमध्ये नीरज होता. नीरजच्या चौकशीच्या आधारावर सीबीआयला क्राईम सीन रिक्रिएशन करायला मदत होणार आहे. सीबीआय सुशांतच्या घरात घटना घडली तिकडे क्राईम सीन रिक्रिएट करण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच सीबीआयने नीरजची गेस्ट हाऊसमध्ये चौकशी केली. क्राईम सीन रिक्रिएशनच्या वेळी सीबीआय नीरजलाही सोबत घेण्याची शक्यता आहे.