राज्याचे मुख्य सचिव कुंटे, पोलीस महासंचालक पांडे यांना सीबीआयचे दुसऱ्यांदा समन्स
CBI summons : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयने दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे.
मुंबई : CBI summons : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयने दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराप्रकरणी चौकशीसाठी सीबीआयने हे पुन्हा समन्स पाठवले आहे. आज चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, याआधी दोघांनी कार्यालयात येऊन चौकशी करावी, असे सांगत सीबीआयपुढे ते हजर झालेले नाहीत. (CBI summons Maharashtra Chief Secretary Sitaram Kunte, Director General of Police Sanjay Pandey for second time)
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना हे पहिल्या समन्सवेळी सीबीआय ऑफीसमध्ये न येता, ऑनलाईन चर्चा केली होती. आता पुन्हा आलेल्या समन्सनंतर कुंटे आणि पांडे काय भुमिका घेतात हे महत्वाचं आहे. मनी लाँडरिंगप्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना चौकशीसाठी हे समन्स पाठवल्याची माहिती आहे.
अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसूली प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर CBIने जे एफआयआर दाखल केले आहे, यासंदर्भात पुढील चौकशीत सीताराम कुंटे आणि संजय पांडे या दोन्ही अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यासाठी CBIकडून समन्स बजावण्यात आला आहे.