मुंबई : काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CBSE) अंतर्गत झालेल्या दहावी आणि बारावीचा परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. cisce.org, results.cisce.org या संकेतस्थळावर हे निकाल पाहू शकता. पास झाल्याचं सर्टिफिकेट ४८ तासांनी मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ICSE चे दहावीचा निकाल हा ९९.३३% आहे तर इंडियन स्कूल सर्टिफिकेट ISC चा बारावीचा निकाल हा ९६.८४% लागला आहे.


रिझल्ट पाहण्यासाठी या ७ पद्धती वापरा. 


स्टेप १ : सर्वात अगोदर cisce.org, results.cisce.org या संकेतस्थळावर जा. 


स्टेप २ : CISE किंवा ISC हे ऑप्शन निवडा. 


स्टेप ३ : आपला आयडी क्रमांक तेथे टाका. 


स्टेप ४ : INDEX No टाका


स्टेप ५ : CAPTCHA भरा. 


स्टेप ६ : निकाल तुमच्या स्क्रिनवर असेल. 


स्टेप ७ : निकालाची प्रिंटआऊट काढा. 


यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये २,०७,९०२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी २,०६,५२५ विद्यार्थी पास झाले आहे. बारावीच्या वर्गात ८८,४०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८५,६११ विद्यार्थी पास झाले. 



या संदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. “तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. मी पुन्हा सांगतो, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे आमचे प्राधान्य आहे.” असे निशंक यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.


कोव्हिडमुळे गुणवत्ता यादी किंवा मेरीट लिस्ट जाहीर करण्यात आलेली नाही. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांचे निकाल एकत्रित जाहीर करण्यात आले आहेत. कोरोनामुळे सीबीएसईचे निकाल लागण्यास उशीर झाला.