Aryan drugs case : शाहरुखची मॅनेजर वादाच्या भोवऱ्यात, CCTV फुटेज SITच्या हाती
पूजा दलानीचं लोअर परळमधील सीसीटीव्ही फुटेज SITच्या हाती
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे मोठ्या अडचणीत आला होता. ड्रग्स प्रकरणी आर्यन तब्बल 25 दिवस जेलमध्ये होता. अखेर 25 दिवसांनंतर त्याला जामीन मंजूर झाला. दरम्यान आर्यनला या प्रकरणात अडवलं जात असल्याचं सांगण्यात आलं होतं. आता याप्रकरणी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जेव्हा खान कुटुंब संकटात होतं तेव्हा त्यांच्यासोबत असणारी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पूजा दलानीचं लोअर परळमधील सीसीटीव्ही फुटेज SITच्या हाती लागलं आहे.
दरम्यान, लोअर परळमध्ये डिल झाल्याची माहिती मिळत आहे. आर्यन खान प्रकरणाचा किरण गोसावीवर खंडणीचा गुन्हा नोंदवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ददलानी आणि गोसावी यांची भेट झाली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुढे काय होतं हे पाहाणे म्हत्त्वाचं ठरणार आहे.
आर्यन खान हाय प्रोफाइल ड्रग्ज प्रकरणात किरण गोसावी आणि पूजा ददलानी मध्ये डील झाल्याचा पंच प्रभाकर साईलने आरोप लावले होते. सॅम डिसुजा, पूजा ददलानी आणि गोसावी यांची लोअर परळमध्ये डिल विषयी मिटींग झाली होती. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा लोअर परळमधील मर्सिडीज कारची सीसीटीव्हीही फुटेज एसआयटी टीमच्या हाती लागली आहे.