राज्यातील एसटी बस स्थानकांत सीसीटीव्हीची नजर
प्रवाशांच्या आणि कर्मच्याऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक आगार आणि बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.
मुंबई : प्रवाशांच्या आणि कर्मच्याऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक आगार आणि बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून बसस्थानक आणि आगार परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून सावध रहा मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे कॅमेरे बसविण्यात येणार आहे.
बसस्थानकावरील वर्दळीचा गैरफायदा घेऊन पाकिटमार, किरकोळ चोऱ्या, महिलांची छेडछाड अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांना आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात येत, अशी माहिती दिवाकर रावते यांनी दिली.