मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फेऱ्या येत्या शुक्रवारपासून वाढविण्यात येणार आहेत. (Central Railway and Western Railway services will be extended from next Friday.) मध्य  रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेने (Western Railway) 204 फेऱ्या वाढवल्या आहेत. मध्य रेल्वेने सध्याच्या 1580 फेऱ्यांमध्ये 105 फेऱ्यांची भर घालत ही 1685 फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेने 1201 वरून फेऱ्यांची संख्या 1300 वर नेलीय. मात्र फेऱ्या वाढवल्या असल्या तरी राज्य सरकारने ज्यांना प्रवासाची मुभा दिली आहे, तेच प्रवासी या लोकल सेवेचा सध्या लाभ घेऊ शकतील. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी विनाकारण स्टेशनांवर गर्दी करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांसाठी ठराविक वेळेत लोकल रेल्वे सुरु आहेत. दरम्यान कार्यालये खुली झाल्याने आता सर्वांसाठी लोकल सेवा खुली करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच सूचक विधान केले आहे. मुंबईतील लोकल सेवा सर्वांसाठी खुली करण्यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, 100 टक्के लोकल चालविण्यात येणार असल्याने ही सेवा सर्वांसाठी खुली होण्याचे संकेत आहेत.


कोरोना लस आली असली तरी अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपलेला नाही. रुग्णसंख्येची आकडेवारी कमी झाली असली तरी कोरोनाचे संकट कायम आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण, हाथ धुणे या गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळ तूर्तास लोकलसाठी सर्वसामान्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.