केंद्रीय मंत्रिमंडळाकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे.
मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे. आताच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे, त्यानंतर ही शिफारस राष्ट्रपतींकडे देखील पाठवली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. डीडी न्यूजने हे वृत्त दिलं आहे. दुसरीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई करण्याला भाजपाच जबाबदार असेल, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी केला आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे, याला जबाबदार भाजप असेल, असा आरोप काँग्रेसचे विजय वडट्टीवार यांनी केला आहे. दुसरीकडे राजभवनात अधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. राज्यपालांनी दिलेल्या शिफारशीप्रमाणे राज्यात रात्री उशीरा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.