मोठी बातमी: मुंबईत कोरोनाच्या रॅपिड टेस्टला केंद्राची परवानगी
रॅपिड टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात संसर्ग झाला आहे किंवा नाही, हे तात्काळ कळू शकते.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: शहरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वेगाने फैलाव होत असल्यामुळे केंद्र सरकारने अखेर मुंबईत रॅपिड टेस्ट करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने रॅपिड टेस्टसाठी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. केवळ केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या किटसवर अवलंबून न राहता मुंबई महानगरपालिका दक्षिण कोरियाकडून जवळपास १ लाख रॅपिट टेस्ट किटसची खरेदी करणार आहे. ही किटस् आल्यानंतर मुंबईतील वरळी आणि धारावी या हॉटस्पॉट असणाऱ्या भागांमध्ये वेगाने रॅपिड टेस्ट केल्या जातील.
मोठी बातमी : केईएम रूग्णालयातील ४७ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण
रॅपिड टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात संसर्ग झाला आहे किंवा नाही, हे तात्काळ कळू शकते. रॅपिड टेस्टमध्ये व्यक्तीला संसर्ग झाल्याचे आढळून आल्यास त्याची कोरोना टेस्ट केली जाईल. यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होण्यापूर्वीच त्यांना वाचवता येऊ शकते.
मुंबईत कोरोनाग्रस्तांची वाढ होण्याची 'ही' मुख्य कारणं
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या अधिक आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्राचा मृत्यूदरही देशात सर्वाधिक आहे. मुंबई कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. आतापर्यंत फक्त मुंबईत ७१४ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळले आहेत. तर ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.