सिंधुदुर्ग : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर (Maharashtra Political Crisis) सातत्याने शिवसेनेवर हल्लाबोल केला जातोय. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडीचं राज्य असताना वांरवार टीका केली. राणेंनी वांरवार मविआला फैलावर घेतलं. आता नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर प्रहार केला आहे. तसेच खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधलाय. (central minister narayan rane critisize to shiv sena and sanjay raut) 


राणे काय म्हणाले? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे अस्तित्व संपले असून आता शिवसेना उठणार नाही अशा शब्दात नारायण राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. गोव्यावरून सिंधुदुर्गात येत असताना त्यांनी काही वेळ थांबून सावंतवाडीतील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस ते बोलत होते. 


आपण ज्योतिषी असून हे सरकार पडणार असल्याचे भाकीत केले होते असंही त्यांनी सांगितलंय. तसच संजय राऊत हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत, काहीतरी केलं म्हणूनच गुन्हा दाखल झाला असाही प्रहार त्यांनी केलाय. त्यामुळे आता राणेंच्या या टीकेला संजय राऊत काय उत्तर देतात, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.