मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (narayan rane on uddhav thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. राणेंनी विविध मुद्द्यांवरुन ठाकरेंवर  जोरदार हल्लाबोल केला. तसेच संजय राऊत यांच्यावरही विखारी शब्दात टीका केली. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत आज प्रदर्शित झाली. या मुलाखतीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी टीका केली. (central minister narayan rane critisized to shiv sena party chief uddhav thackeray over to after his interview)


नारायण राणे काय म्हणाले? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांनी विचारलेले प्रश्न आणि आधीच ठवलेली उत्तरं यावर मी माझी प्रतिक्रिया देतोय.  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना मराठी माणूस, हिंदुत्व आणि शिवसैनिक यांची आठवण होतेय. त्यांची चिंता वाटतेय.


अडीच वर्ष सत्तेत असताना त्यांना शिवसैनिक आठवला नाही, हिंदुत्व आणि मराठी माणूसही आठवला नाही. आता ते पत्रकार परिषदेत आपलं मनोगत व्यक्त केलं. सत्ते गेल्यानंतर तडफडणेच्या भावनेतून एक केविलवाना प्रयत्नात त्यांनी आपली व्यथा महाराष्ट्रसामोर आणि देशासमोर मांडली आहे.


मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे ते व्याकूळ झाले आहेत. ते म्हणतात मुख्यमंत्री गेलं तरी मला कोणतही दु:ख नाही. उद्धव ठाकरे यांनी मी पार जवळून ओळखतो. अंगात खोटारडेपणा आहे, कपटीपणा आहे आणि दृष्ट बुद्धी आहे. असा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसून त्यांनी अडीच वर्षात ना जनतेचं ना शिवसैनिकांचं आणि ना हिंदुत्वाचं कोणतंही हिंत किंवा कामं केलेली नाही. आजारपण आणि मातोश्री यातच त्यांचं कार्य.


या मुलाखतीमध्ये मी आजारी होता, मी शुद्धीवर नव्हतो त्याचवेळी गद्दारांनी सरकार पाडलं असं ते म्हणतात. शिवसैनिक निवडून आले, सत्ता आणली आणि जेव्हा उद्धव ठाकरे पक्षपात केला त्यावेळी त्यांनी दुसरा गट करुन शिवसेनेच्याच नावावर ते बाहेर पडले आणि सरकारमध्ये गेले.


स्वत:चं पद एकनाथ शिंदे मिळालं याचं पोटशूळ यातूनच ही मुलाखत संजय राऊत यांना घ्यायला लावली. संजय राऊत यांनी आणखी एक काम हातात घेतलं ते पूर्ण करायला लावलं. संजय राऊत यांनी पहिलं काम केलं ते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन खाली उतरवायचं. आणि आता त्यांच्या जखमेवर मीट चोळण्यासाठी ही मुलाखत घेतली. 


संजय राऊत मनातून खुश आहेत मी विजयी झालो, फत्ते केरं, माझ्या गुरुने शरद पवार यांनी दिलेलं काम उत्तम रित्या पार पाडलं याचं त्यांना समाधान आहे.