मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी मध्य रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक (Jumbo Mega Block) घेण्यात येणार आहे. एकूण 24 तासांचा हा जम्बो मेगाब्लॉक असणार आहे. येत्या रविवारी 2 जानेवारी ते सोमवार 3 जानेवारीदरम्यान हा 24 तासांचा जम्बो ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. (central railway 24 hour mega block starting Sunday 2 january 2022 2am to monday 2am during kalva and diva railway stations)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की कारण काय? 


मध्य रेल्वेवरील कळवा अणि दिवा या स्थानकादरम्यान स्लो कॉरिडॉरवर 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेच्या कामासाठी हा मेगाब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक रविवारी रात्री 2 वाजल्यापासून ते सोमवारी 3 जानेवारी रात्री 2 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. 



कळवा आणि दिवा दरम्यानच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाही.