Mumbai Local Special Train: मध्य आणि पश्चिम रेल्वे नववर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष लोकल चालवणार आहे. पश्चिम रेल्वे 31 डिसेंबर 2022 आणि 1 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री आठ विशेष लोकल ट्रेन चालवणार आहे. तसेच मध्य रेल्वेही (Central Railway) विशेष गाड्या सोडणार आहेत. दोन दिवसांपासून चांगलीच थंडी सुरु झाली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे (New Year 2023) स्वागत करण्यासाठी अनेक मुंबईकर घराबाहेर पडतात. तर काही जण नववर्षाचे स्वागत करण्यासाठी महामुंबईतील नागरिक शहरातील पर्यटनस्थळांना भेट देतात. गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाइन्स, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. नववर्ष जल्लोष केल्यानंतर रात्रीचा प्रवास सुखकर होण्यासाठी रात्री ते पहाटेपर्यंत आठ लोकल चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने (Western Railway) घेतला आहे. 


नवीन वर्षाच्या उत्सवानंतर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी फेऱ्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थर्टीफर्स्टला पश्चिम आणि मध्य रेल्वे विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे चर्चगेट ते विरारदरम्यान विशेष फेऱ्या रात्री उशिरा चालवणारय. तर मध्य रेल्वेवरही पहाटेपर्यंत विशेष फेऱ्या सुरु राहतील. यामुळे रात्री उशिरापर्यंत थर्टीफर्स्ट सेलिब्रेशन करणाऱ्या मुंबईकरांना सुखकर प्रवास करुन घरी पोहोचता येईल. त्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडणार नाही. नवीन वर्षाच्या उत्सवानंतर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी चर्चगेट ते विरार पर्यंत 1 जानेवारी रोजी पहाटे 1.15, पहाटे 2, 2.30 आणि पहाटे 3.25 वाजता चार विशेष लोकल आणि विरार ते चर्चगेट येथे चार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला.  त्यामुळे आता शेवटची लोकल चुकण्याची चिंता न करता लोक नवीन वर्ष साजरे करु शकणार आहेत. या निर्णयाचे स्वागत करताना पश्चिम रेल्वेच्या लोकल प्रवाशांनी सांगितले की, त्यामुळे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा आनंद वाढणार आहे.


मध्य रेल्वेवरदेखील रात्री उशिराने लोकल फेऱ्या 


 नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार दरम्यान आठ लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तर मध्य रेल्वेवरदेखील रात्री उशिराने लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले असून लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.३१ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३


पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल फेऱ्या


चर्चगेट ते विरार : रात्री 1.15
चर्चगेट ते विरार : रात्री  2.00
चर्चगेट ते विरार : रात्री  2.30
चर्चगेट ते विरार : रात्री  3.25
विरार ते चर्चगेट : रात्री  12.25
विरार ते चर्चगेट : रात्री  12.45
विरार ते चर्चगेट : रात्री  1.40
विरार ते चर्चगेट : रात्री 3.5