मुंबई : मध्य रेल्वेने एप्रिल २०१८ ते मे २०१८ दरम्यान फुकट तसेच अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध अभियान चालवत यातून ४२.१५ कोटी रुपयांची कमाई केली. हे अभियान रेल्वे प्रवाशांना चांगली सर्व्हिस देण्यासाठी तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम लावण्यासाठी चालवले जाते. विनातिकीट तसेच अनियमित प्रवाशांमुळे होणारी हानी रोखण्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या अभियानावर नजर ठेवून असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी विना तिकीट/अनियमित प्रवास तसेच बुक न केलेल्या सामानाचे ७.२५ लाख केसेस दाखल करण्यात आल्या होत्याच्या ज्याच्या तुलनेत एप्रिल २०१८ ते मे २०१८ दरम्यान विना तिकीट/अनियमित प्रवास तसेच बुक न केलेल्या सामनाच्या एकूण ७.५९ लाख प्रकरणे दाखल करण्यात आली.यामध्ये या वर्षात ४.७० टक्क्यांची वाढ झाली. 


एप्रिल २०१८ ते मे २०१८ या दरम्यान आरक्षित तिकीट हस्तांतरणाच्या १५१७ केसेस दाखल करण्यात आल्यात तर १२.७७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्याता आलाय.