मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवर धावणारी बम्बार्डियर लोकल आता मध्य रेल्वेवरही धावणार आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


हवेशीर आणि आरामदायी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवेशीर आणि आरामदायी असणाऱ्या या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता सीएसएमटी ते कल्याण आणि बदलापूर मार्गावर बम्बार्डियर लोकल चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय.


एकूण १२ फेऱ्या होणार 


मध्य रेल्वेने घेतलेल्या निर्णयानुसार, पहिली लोकल मध्य रेल्वेच्या सेवेत लवकरच दाखल होणार असून तिच्या बारा फेऱ्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आलीय.


या बम्बार्डियर लोकलची वैशिष्ट्ये पाहूयात..



मध्य रेल्वे मार्गावर भारतीय तंत्रज्ञान वापरण्यात आलेल्या ‘मेधा’ लोकलही येणार होत्या. या लोकल पश्चिम रेल्वेवर वळत्या करण्यात येत असून त्याबदल्यात बम्बार्डियर लोकल मध्य रेल्वेला मिळणार आहेत आणि यातीलच एक लोकल सेवेत येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.