मुंबई : Mumbai Central Railway News :बतमी मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांसाठी. मध्य रेल्वेच्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांचा (Mumbai Local) खोळंबा झाला आहे. (Central Railway disrupted) यामुळे ऑफीसला पोहोचण्यासाठी मुंबईकरांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच लेटमार्कचा फटका बसणार आहे.  माटुंगा  दादर , परेल दरम्यान सीएसएमटीच्या दिशेने लोकलच्या रांगा लागल्या आहेत. गाड्यांचा खोळंबा हा तांत्रिक बिघाड झाल्याने झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कामावर जाण्याच्या वेळी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. दादर येथे सिग्नलमध्ये काही बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक जलद गाड्या धिम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. घाटकोपर ते कुर्ला दरम्यान, ही वाहतूक वळविण्यात आली आहे. तर सायनपासून दादरपर्यंत लोकल थांबत थांबत पुढे सकरत आहेत.  सीएसएमटी स्थानकाकडे जाणाऱ्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. दादर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.



कुर्ला ते दादर हे अंतर कापण्यासाठी 45 मिनिटे लागत आहेत. दादरनंतर सीएसटीकडे गाड्या सुरुळीत धावत आहेत. मात्र अप आणि डाऊन या मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहेत.