ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
तांत्रिक बिघाडामुळे खोळंबा
दिवा आणि कोपर स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे कल्याणकडे जाणाऱ्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकात अंधार
तर, तिकडे ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील ऐरोली रेल्वे स्थानकात विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. विद्युत प्रवाह खंडित झाला असला तरी रेल्वेसेवा मात्र, सुरळीत सुरु आहे.
गेल्या २ तासांपासून रेल्वे स्थानकात अंधार
पण, गेल्या दोन तासांपासून ऐरोली रेल्वे स्थानकात अंधार झाला आहे.
ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा
संध्याकाळच्या वेळी सर्व कार्यालय, महाविद्यालय सुटण्याची वेळ असते. यावेळी मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. पण, आता तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.