मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
डोंबिवली - दिवादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबई : डोंबिवली - दिवादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे चाकरमाण्यांचे हाल झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जलद मार्गाची वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल होत आहेत.
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येतेय. दिव्यापर्यंत वाहतूक ठप्प असल्यामुळे उपनगरीय रेल्वे गाड्या त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहे. उपनगरीय गाड्यांची वाहतूक पाऊन तास उशीराने धावत आहेत.