मध्य रेल्वेला प्रवासी संघटनांचा दणका, वेळापत्रकात बद्दल
प्रवासी संघटनांचा आक्रमकपणा पाहून, मंगळवारी सायंकाळी हिवाळी वेळापत्रक रद्द करण्याची घोषणा केली. २१ डिसेंबरपासून पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे लोकल फेऱ्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
मुंबई : प्रवासी संघटनांचा आक्रमकपणा पाहून, मंगळवारी सायंकाळी हिवाळी वेळापत्रक रद्द करण्याची घोषणा केली. २१ डिसेंबरपासून पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे लोकल फेऱ्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने
हवामानातील बदलामुळे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात धूरके जमा होत आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने धावत होत्या. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने कसारा आणि कर्जत मार्गावरील काही फे-यांच्या वेळेत बदल केला.
नव्या वेळापत्रकाचा प्रवाशांना ताप
या बदलामुळे प्रवाशांचा फायदा कमी आणि मनस्तापच जास्त सहन करावा लागला. यामुळे प्रवासी संघटनांच्या शिष्टमंडळांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांची सोमवारी भेट घेतली.