Central Railway Job: तुम्हाला खेळाची आवड असेल? तुम्ही कोणत्या खेळात प्राविण्य मिळवले असेल आणि यासोबतच चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती सुरु आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेअंतर्गत महाराष्ट्रात ही भरती सुरु आहे. या भरतीअंतर्गत एकूण 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. खेळाडू ग्रुप सीच्या एकूण 21 जागा आणि खेळाडू ग्रुप डीच्या एकूण 41 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी/ आयटीआय/बारावी/पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने संबंधित क्रीडा पात्रता पूर्ण केलेली असावी.


मध्य रेल्वेच्या खेळाडू ग्रुप सी आणि खेळाडू ग्रुप डीच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25 वर्षेांदरम्यान असावे. एससी/एसटी उमेदवारांना वयोमर्यादेत 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे सवलत देण्यात येणार आहे. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रात नोकरी करता येणार आहे. अर्ज करणाऱ्या जनरल/ओबीसी उमेदवारांकडून 500 रुपये शुल्क घेण्यात येईल. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/एक्स सर्व्हिसमन/महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. 


या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 5 हजार 200 ते 20 हजार 200 रुपये पगार दिला जाणार आहे. इच्छुक उमेदवार आपला अर्ज 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत पाठवू शकतात. मध्य रेल्वेची अधिकृत वेबसाइट cr.indianrailways.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


दूरसंचार विभागात विविध पदांची भरती


दूरसंचारमधील आठ विभागांमध्ये एकूण 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ही पदे कोणती यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची अंतिम तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. टेलिकॉम डिपार्टमेंटमध्ये एकूण 39 रिक्त जागा भरल्या जातील. यामध्ये  एएओ ( AAO) ची 1 जागा,  पीएस स्टेनो गॅझेटेडची 1 जागा, पीएस स्टेनो नॉन गॅझेटेडची 1 जागा, सीनियर अकाउंटंटच्या 21 जागा, स्टेनोची 1 जागा, एलडीसी (LDC) च्या 12 जागा, एमटीएस (MTS) च्या 2 जागा भरण्यात येणार आहेत. 


एएओ पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 47 हजार 600 ते 51 हजार 100 रुपये, पीएस स्टेनो गॅझेटेड पदासाठी उमेदवारांना दरमहा 44 हजार 900 ते 1 लाख 42 हजार 400 , पीएस स्टेनो नॉन गॅझेटेड पदासाठी उमेदवारांना 35 हजार 400 ते 1 लाख12 हजार 400 रुपये, सिनियर अकाउंटंट पदासाठी 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपये, स्टेनो पदासाठी उमेदवाराला  25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये, एलडीसी (LDC) पदासाठी उमेदवाराला 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपये पगार, एमटीएस (MTS) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18 हजार ते 56 हजार 900 रुपये पगार दिला जाणार आहे. 31 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दूरसंचार विभाग,द जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, बीएसएनएल प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, जुहू रोड. सांताक्रूझ पश्चिम. मुंबई- 400054 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.