देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऐन कार्यालयं सुटण्याच्या वेळेस हा सर्व खोळंबा झाल्याने प्रवाशांचा संताप पहायला मिळतोय. (central railway technical failure between thane and kalwa station slow and delayed traffic on fast line)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेच्या ठाणे-कळवा स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे स्लो आणि जलद मार्गावरील वाहतूक ही उशीराने सुरु आहे. एकामागोमाग एक गाड्या उभ्या आहेत. ऑफिस सुटण्याच्यावेळेस ठाणे आणि पुढे कसारा आणि कर्जतच्या दिशेने जाणारा मोठा वर्ग आहे. मात्र आता रेल्वे वाहतूक उशिराने होत असल्याने प्रवाशांची स्थानकावर एकच गर्दी पहायला मिळतेय.


प्रवाशांचा संताप 


मध्य रेल्वेची वाहतूक सातत्याने विस्कळीत होत असते. दर रविवारी मेगाब्लॉक घेऊनही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांचा संताप होतो. मध्य रेल्वे प्रशासनाने या समस्येवर तोडगा काढावा, ज्यामुळे प्रवाशांची ही गैरसोय होणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रवाशांची आहे.  


दरम्यान या तांत्रिक बिघाडामुळे ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2, 3, 4 आणि 5 वरील लोकल पुढील आदेशापर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या सर्व लोकल गाड्या मुलुंड स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत.