मुंबई : मध्य रेल्वेनं महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मराठीत तिकीटं देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. त्यामुळे आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आजपासून मराठीत तिकीटं मिळणार आहेत. लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचं अनारक्षित तिकीट मराठीतून मिळणार आहेत. तिकिटावर आता रेल्वे स्थानकाचं नाव हिंदी आणि इंग्रजीसह मराठीतही असणार आहे. यापूर्वी रेल्वे तिकिटावर केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर होत होता.