मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीलाच ऐन सोमवारी मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. कुर्ल्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत आहे. मध्य रेल्वेचे वेळापत्रक आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कोलमडले असल्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वे सातत्याने कोलमडत असल्याचे दिसते. कुर्ल्याजवळ मध्य रेल्वेचे सर्वात मोठे सिग्नल यंत्रेणेचे सेंटर आहे. त्याच यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागणार आहे.