मध्य रेल्वेच्या ताफ्यात पहिली एसी लोकल दाखल होणार
मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेली पहिली एसी लोकल इगतपुरीहून मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेली पहिली एसी लोकल इगतपुरीहून मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहे. संध्याकाळपर्यंत ती मुंबई कारशेडमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळं मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गारेगार प्रवासाची प्रतिक्षा अखेर संपलीय. लवकरच मध्य रेल्वेवर एस सी लोकल सुरू होणार आहे.
चेन्नईच्या आयसीएफ रेल्वे कारखान्यात या लोकलची निर्मिती झालीय. येत्या १५ दिवसांत मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन, ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्ग अशा तिन्ही मार्गावर ही लोकल धावेल, अशी अपेक्षा आहे.
मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर सर्वात आधी वातानुकूलित लोकलगाडी सुरू करण्यात आली आहे, यानंतर मध्य रेल्वेनेही आता एसी लोकल सुरू करण्याकडे लक्ष वळवलं आहे.