मुंबई :  केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांची भेट घेतली आहे. गडकरींनी ही भेट रस्ते सुरक्षा अभियानासंदर्भात (Road Safety Campaign) अमिताभ बच्चन यांची भेट घेतल्याचं समजतंय. मुंबईत अमिताभ बच्चन यांच्या घरी गडकरींनी बच्चन यांची भेट घेतली. रस्ते सुरक्षा अभियानाचे चॅम्पियन म्हणून अमिताभ बच्चन यांनी योगदान द्यावं, अशी विनंती गडकरी यांनी अमिताभ बच्चन यांना केली. यावेळी अभिषेक बच्चनही उपस्थित होते. (central transport minister nitin gadkari met amitabh bachchan for national road safety mission at mumbai)


मुंबईत इलेक्ट्रीक एसी डबल डेकरचं लॉन्चिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान गडकरींच्या उपस्थितीत आज मुंबईत पहिल्या इलेक्ट्रीक एसी डबल डेकरचं बसचं लॉन्चिंग झालं. एसी डबलडेकर बसचं भाडं कमीत कमी 6 रूपये असणार आहे. 


पहिल्या 5 किमीसाठी 6 रूपये भाडं आकारलं जाईल. सीएसएमटी ते नरिमन पॉईंट, कुलाबा ते वरळी, कुर्ला ते सांताक्रूझ या मार्गांवर सुरूवातीला या बसेस धावतील. या बसेसमध्ये दोन जिने असतील. डिजिटल टिकिटींग, सीसीटीव्ही अशा सुविधा या एसी डबलडेकरमध्ये असणार आहेत.


गडकरींना मोठा धक्का


दरम्यान भाजपने बुधवारी संसदीय मंडळाची घोषणा केली. या संसदीय मंडळातून नितीन गडकरींना मोठा झटका लागला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री झाली आहे.