महत्वाची बातमी! अकरावी सीईटी परीक्षेची तारीख जाहीर, `या` तारखेला होणार परीक्षा
विद्यार्थ्यांना उद्यापासून सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत
मुंबई : दहावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आात आता 11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं आहे. 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत ही परीक्षा राज्यभरात पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना 20 जुलै म्हणजे उद्या सकाळी 11.30 वाजल्यापासून 26 जुलैपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
राज्यात काही दिवस अगोदरच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी इयत्ता 11वी ची सीईटी द्यावी लागणार आहे. या सीईटीच्या आधारेच विद्यार्थ्यांना विविध नामांकीत महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत असतो.
या परीक्षेसाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावं लागणार नाही. तर इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. सीईटी परीक्षा ऐच्छिक असणार असून 100 गुणांसाठी गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इंग्रजी या चार विषयांचे प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत.
यंदा दहावीत एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोरोना प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचं दहावीचं मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन अधिक नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे करण्यात आलं आणि निकाल जाहीर करण्यात आला होता.