भुजबळांना रुग्णालयातून घरी जाण्यास परवानगी, केईएममधून डिस्चार्ज
दोन दिवस आराम केल्यानंतर पुढील उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल होणार
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : छगन भुजबळ यांना केईएममधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल सव्वा दोन वर्षांनी भुजबळ घरी परतणार आहेत. थोड्याच वेळात ते सांताक्रूझच्या घरी जातील. दोन दिवस आराम केल्यानंतर पुढील उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. भुजबळांवर उपचार करणारे त्यांचे खाजगी डॉक्टर परदेशात असल्याने सध्या भुजबळ घरीच थांबणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ओबीसी योद्धा पुरस्कार
न्यायालयाकडून जामीन मिळालेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी योद्धा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. उद्या म्हणजे ११ मे रोजी मुंबईतील आझाद मैदानात भारीप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. राज्य स्तरीय ओबीसी जातनिहाय जनगणना अभियान कृती समितीच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे.संविधानिक न्याय यात्रांतर्गत राज्यस्तरीय ओबीसी जातनिहाय जनगणना अभियान 11 एप्रिल 2018 रोजी पुणए येथील समताभुमी-फुलेवाड्यापासून सुरु झालीये. 11 मे रोजी सकाळी 11 वाजता या अभियानाच्या समारोपाची जाहीर सभा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. त्यावेळी छगन भुजबळांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. यावेळी जर त्यांची सुटका झाली नाही तर त्यांची खुर्ची रिकामी ठेऊन ही परिषद संपन्न करण्यात येईल असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.